Advertisement

पबजी आजपासून भारतातून पूर्णपणे हद्दपार

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे दोन्ही ऍप्स भारतात आजपासून (३० आॅक्टोबर ) पूर्णपणे बंद होणार आहेत. पबजी मोबाईल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स या कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

पबजी आजपासून भारतातून पूर्णपणे हद्दपार
SHARES

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे दोन्ही ऍप्स भारतात आजपासून (३० आॅक्टोबर ) पूर्णपणे बंद होणार आहेत. पबजी मोबाईल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स या कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय कंद्र सरकारने २ सप्टेंबरला घेतला.  त्यामध्ये पबजी मोबाइल आणि पबजी मोबाईल लाइट या दोन्ही ऍप प्लॅटफॉर्मचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी पबजी मोबाईल कंपनीने लिंक्डइनवर नोकरभरतीसंबंधी एक जाहिरात दिली होती. त्यानंतर पबजी मोबाइल कंपनी लवकरच भारतात आपले गेम पुन्हा मोबाइलवर उपलब्ध करून देणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने अधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. 

अखेर शुक्रवार ३० आॅक्टोबरपासून पबजी भारतातून पूर्णपणे हद्दपार होत आहे. याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, पबजी गेम भारतात पूर्णतः बंद केला जातोय, ही फार खेदाची बाब आहे. यासोबत त्यांनी भारतातील पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या गेमच्या चाहत्यांचे आणि गेमचे समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

टॅन्सेंट पबजी ऍपच्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होती. दररोज या कंपनीला तब्बल ३ कोटी ऍक्टिव्ह युजर्स जोडले जात होते. परंतु भारतात चीनच्या ११८ ऍप्सवर बंदी आणल्यानंतर या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अरब डॉलरने घसरला.हेही वाचा -

मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement