Advertisement

नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?


नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?
SHARES

आर्थिक सुधारणांच्या नावाखाली नोटाबंदीचा निर्णय पचवणारं मोदी सरकार आता नाणेबंदीचा निर्णय घेत पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याचा विचार करत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारच्या निर्देशावरून रिझर्व्ह बँकेने देशातील ४ प्रमुख टांकसाळीतील नाण्याचं उत्पादन पूर्णपणे थांबवलं आहे.


कुठे होतं नाण्याचं उत्पादन?

सद्यस्थितीत मुंबई कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा अशा ४ शहरांतील टांकसाळीमध्ये नाण्याचं उत्पादन केलं जातं. मात्र या चारही टांकसाळीतील नाण्याचं उत्पादन मंगळवारपासून बंद करण्यात आल्याची माहिती आरबीआयमधील सूत्रांनी दिली.


उत्पादन बंद का?

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नाण्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात आली. त्यानुसार बाजारात नाण्यांचा साठा वाढला. पण उत्पादन अधिक झाल्याने आरबीआयकडे ही नाणी ठेवायला जागाच उरली नाही. त्यामुळे सरकारने नाण्यांचं उत्पादन थांबवण्याचं निर्णय घेतल्याचं आरबीआयच्या प्रवक्त्याने सांगितलं. या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण आरबीआयकडे मुबलक नाण्यांचा साठा आहे.


२५० कोटींची नाणी पडून

सध्या २५० कोटी नाणी टांकसाळीत पडून अाहेत. जोपर्यंत आरबीआय ही नाणी बाजारात उतरवत नाही. तोपर्यंत नाण्यांचं पुढील उत्पादन करण्यात येणार नाही. सध्या बाजारात १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात आहेत. १० रुपयांच्या नाण्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.



हेही वाचा-

बघा 'अशी' आहे १० रुपयांची नवी नोट!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा