कपोल बँकेतील खाती गोठवल्याने खातेधारक हवालदील

 Mumbai
कपोल बँकेतील खाती गोठवल्याने खातेधारक हवालदील
Mumbai  -  

मालाड - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कपोल को. ऑपरेटिव्ह बँकची खाती गोठवल्याने या बँकेतील खातेदार हवालदील झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच बँकेत येणाऱ्या खातेधारकांना तीन हजार रुपये बँकेतून काढता येत असून यानंतर सहा महिन्यांनी किंवा पुढील आदेश आल्यानंतर पैसे मिळतील असे बँकेकडून सांगण्यात येत आहे. कपोल बॅंकचे अडीच लाख खातेदार असून रिझर्व्ह बँकने कपोल बँक खातेदारांना सूचना देणाऱ्या नोटीस लावल्या आहेत. परंतु यामुळे खातेदार नाराज असून याची सूचना सरकारने अगोदर देणे गरजेचे होते. तसेच संपूर्ण रक्कम काढून घेण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी खातेधारक करत आहेत.


अचानकपणे खाती गोठवल्याने आम्हाला खूप त्रास झाला असल्याची प्रतिक्रिया खातेधारक कमलेश पगानी यांनी दिली. तर या बँकेत सहा लाखाची रक्कम भरली असून रिझर्व्ह बँकेने कपोल बँकेवर निर्बंध लादल्याने सर्वच खातेदारांसमोर अडचण निर्माण झाली असून आपले पैसे आपल्याला परत मिळायला हवेत अशी प्रतिक्रिया खातेधारक रंगनाथ सांगळे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.

Loading Comments