Advertisement

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल नाही

गुरूवारी आरबीआयने पतधोरण जाहीर केले. यावेळी व्याजदरात कसलाच बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल नाही
SHARES

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India - आरबीआय) रेपो दर (repo rate) आणि रिव्हर्स रेपो दरात (Reverse repo rate) काहीच बदल केला नाही. गुरूवारी आरबीआयने पतधोरण जाहीर केले. यावेळी व्याजदरात कसलाच बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. व्याजदर जैसे थे राहिल्याने कर्जदारांना कर्ज (loan) स्वस्त होण्याची आणखी वाट पहावी लागणार आहे. 

रेपो दर  (repo rate) ५.१५ टक्के,  रिव्हर्स रेपो दर  (Reverse repo rate) ४.९० टक्क्यांवर कायम राहिला आहे. आरबीआयने सीआरआर (crr) आणि एसएलआर (slr) दरातही काहीच बदल केला नाही. सीआरआर ४ टक्के तर एसएलआर १८.५ टक्के आहे. पतधोरण जाहीर करताना आरबीआयने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकास दर ६ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. डिसेंबरमधील पतधोरणावेळीही आरबीआयने (rbi) व्याजदरात काहीच बदल केला नव्हता. त्याआधी मात्र आरबीआयने सलग पाचवेळा रेपो दरात कपात केली होती. 


 रेपो रेट म्हणजे काय ?

ज्या दराने रिझर्व बँक बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट (repo rate). रेपो रेट वाढल्यास बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज महाग होतं. त्यामुळं बँकाही आपला व्याजदर वाढवून आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग करतात. रेपो दर कमी झाल्याने बँकांही आपले व्याजदर कमी करून कर्ज स्वस्त करतात. 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट (Reverse repo rate)  म्हणजे रेपो रेटच्या (repo rate) अगदी उलट. बँका त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त निधी ठेवींच्या रुपात रिझर्व बँककडे जमा करतात. या ठेवींवरील  व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 



हेही वाचा -

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम

कर वाचवण्याची घाई करताना टाळा 'ह्या' चुका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा