Advertisement

कर वाचवण्याची घाई करताना टाळा 'ह्या' चुका

अनेकदा लोक प्राप्तिकर (income tax) बचतीसाठी शेवटच्या वेळेची वाट पाहतात आणि मग गुंतवणूकीत चूक करतात. अशी चूक होऊ नये म्हणून कर बचतीसाठी योग्य गुंतवणूकीचा पर्याय निवडणं आवश्यक आहे.

कर वाचवण्याची घाई करताना टाळा 'ह्या' चुका
SHARES

बरेच लोक पैशाशी संबंधित गोष्टी स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग ते करबचत (tax saving) असो की बँकिंग (Banking) विषयी. अनेकदा लोक प्राप्तिकर (income tax) बचतीसाठी शेवटच्या वेळेची वाट पाहतात आणि मग गुंतवणूकीत चूक करतात. अशी चूक होऊ नये म्हणून कर बचतीसाठी योग्य गुंतवणूकीचा पर्याय निवडणं आवश्यक आहे. कर वाचवण्याच्या नादात गुंतवणूकदार (Investor) काही चुका करत असतात. अशा चुका कशा टाळता येईल याची माहिती आपण घेऊया.SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ

अनावश्यक विमा पॉलिसी (tax saving)

ज्यांना प्राप्तिकर वाचवायचा आहे ते अनेकदा कर बचतीसाठी आवश्यक नसलेली विमा पॉलिसी (Insurance policy) खरेदी करतात. गुंतवणूकदारांनी फक्त कर (tax) वाचवण्यासाठी अनावश्यक पाॅलिसी खरेदी करू नये, गुंतवणूक  (investment) खरोखर दीर्घ काळासाठी आपल्या फायद्यासाठी आहे का याचा विचार करावा. अन्यथा, यामध्ये आपण फायद्याची गुंतवणूक न करता फक्त पैसे खर्च करत असतो.

कर बचतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं

करबचत (tax saving) योजनेसाठी ईएलएसएस (elss) सारख्या म्युच्युअल फंडामध्ये (Mutual fund) गुंतवणूक करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला गुंतवणूक करणं आवश्यक ठरेल. कर बचतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबल्यास घाईघाईने घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता असते. बहुतांशी कर बचत गुंतवणूक ह्या दीर्घकालीन असतात. यामुळे अशा परिस्थितीत एजंटांच्या सापळ्यात अडकून चुकीची गुंतवणूक करू नका.

अतिरिक्त लाभ म्हणून कर बचत

अनेकजण कर (tax) वाचवायचा आहे म्हणून फक्त गुंतवणूक (investment) करतात. पण फक्त करबचत (tax saving) न पाहता ही गुंतवणूक जास्तीत जास्त कशी फायद्याची होईल हे ही पाहणं अत्यावश्यक आहे. यासाठी आपण पत्करू शकणारी जोखीम आणि कालावधी याचा विचार करून गुंतवणूक उत्पादन निवडून अतिरिक्त लाभ म्हणून कर बचत पर्याय निवडावा.

कलम ८० ई अंतर्गत दावा न करणे

कलम ८० ई अंतर्गत शिक्षण कर्जावरील व्याजात कर सवलत मिळू शकते. जर तुम्ही या कर्जाची (loan) परतफेड करण्यास उशीर करत असाल तर तुमच्या व्याजाचा बोजा वाढवण्याSBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझबरोबरच तुम्ही प्राप्तिकरातूनही दिलासा मिळण्यास विलंब लावत आहात. वेळेवर पेमेंट केल्यास थकबाकी कमी होईल आणि क्रेडिट स्कोअर (Credit score) मध्येही सुधारणा होईल.


हेही वाचा -

राहुल बजाज सोडणार बजाज ऑटोचं अध्यक्षपद

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा