Advertisement

नवीन नोटा आल्यानंतरच ५, १०, १०० च्या जुन्या नोटा रद्द- आरबीआय

५, १०, १०० रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनात नसतील असं आरबीआयने म्हटलं आहे. या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

नवीन नोटा आल्यानंतरच ५, १०, १०० च्या जुन्या नोटा रद्द- आरबीआय
SHARES

५, १०, १०० रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनात नसतील असं आरबीआयने म्हटलं आहे. या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. मात्र, आरबीआय अचानक  ५, १०, १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करणार नाही.  नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असं आरबीआयने म्हटलं आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी याबाबत सांगितलं की, या जुन्या नोटांची मालिका मागे घेण्याच्या योजनेवर आरबीआय सध्या काम करत आहे. पण नोटा बाद करण्याआधी  ५, १०, १०० च्या नवीन नोटा बाजारात आणल्या जातील. त्यामुळे सध्या या नोटांवर बंदी नसून बाजारात नव्या नोटा आल्या की जुन्या नोटा बाद होतील.

दहा रुपयांच्या नाण्यांविषयी सध्या बाजारात वेगवेगळा अफवा पसरविल्या जात आहेत. काही  व्यापारी किंवा दुकानदार दहाचं नाणं घेण्यास नकार देत आहेत.यावर आरबीआयने म्हटलं की, ही बँकेसाठी अडचण आहे. म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये १० रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयकोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये.हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकलRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा