Advertisement

लवकरच येणार १०० रुपयांची नवी नोट


लवकरच येणार १०० रुपयांची नवी नोट
SHARES

रिझर्व्ह बँक अाॅफ इंडिया (अारबीअाय) लवकरच १०० रुपयांची नवी नोट बाजारात अाणणार अाहे. महात्‍मा गांधीच्या सीरीजमध्ये येणाऱ्या या नोटेमध्ये नवीन डिझाइन असणार अाहे. तसंच या नोटेवर गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही असेल. नवीन नोटेचा रंग जांभळा असणार अाहे. तर नोटेवर जागतिक वारसा लाभलेल्या गुजरातमधील राणीच्या विहिरीचं चित्र असणार अाहे.


नोटेचा अाकार

नवीन नोट जुन्या १०० रुपयाच्या नोटेपेक्षा छोटी अाणि १० रुपयाच्या नोटेपेक्षा थोडी मोठी असेल. या नोटेचा अाकार ६६ मिमी ×१४२  मिमी  अाहे. ही नवी नोट चलनात अाली तरी जुनी १०० रुपयांची नोटही चलनात राहणार असल्याचं अारबीअायनं म्हटलं अाहे.


छपाई सुरू

नोटेच्या नवीन डिझाईनला अंतिम रुप म्हैसूर येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये दिलं अाहे. या ठिकाणी २ हजार रुपयांचीही नोट छापली जाते. यावेळी नोट छापताना एक मोठा बदल केला गेला अाहे. नवीन नोटेच्या छपाईत स्वदेशी शाई अाणि कागदाचाच वापर केला जाणार अाहे.


एटीएमध्ये होणार बदल 

नवीन १०० रुपयांची नोट ठेवण्यासाठी बँकांना अापल्या एटीएम मशीनमधील पैसे ठेवण्याच्या ट्रेमध्ये अाता पुन्हा एकदा बदल करावा लागणार अाहे. २०१४ मध्ये केंद्रात नवीन सरकार अाल्यापासून अातापर्यंत बँकांना ४ वेळा एटीएम मशीनमध्ये बदल करावा लागला अाहे. याअगोदर २०००, ५०० अाणि २०० रुपयांच्या नवीन नोटांसाठी बदल करावा लागला होता. 



हेही वाचा - 

१३ वर्षीय मुलानं तयार केलं कुरियर अॅप

डिमांड ड्राफ्टवर अाता पैसे देणाऱ्याचंही नाव, अारबीअायचा निर्णय




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा