Advertisement

डिमांड ड्राफ्टवर अाता पैसे देणाऱ्याचंही नाव, अारबीअायचा निर्णय


डिमांड ड्राफ्टवर अाता पैसे देणाऱ्याचंही नाव, अारबीअायचा निर्णय
SHARES

 डिमांड ड्राफ्टवर अाता पैसे देणाऱ्याचंही नाव असणं बंधनकारक असणार अाहे. काळा पैसा अाणि पैसे अफरातफरीला अाळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (अारबीअाय) हा महत्त्वाचा निर्णय घेतला अाहे.

अातापर्यंत डिमांड ड्राफ्टवर ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जाणार अाहेत त्याचंच नाव असायचं. पैसे भरणाऱ्या व्यक्तीचं नाव डिमांड ड्राफ्टवर नसायचं. मात्र, अारबीअायच्या या निर्णयामुळे पैसे भरणाऱ्याला अापलं नाव डिमांड ड्राफ्टवर टाकावं लागणार अाहे.


१५ सप्टेंबरपासून लागू 

नवीन नियम १५ सप्टेंबरपासून लागू होणार अाहे. अारबीअायच्या या निर्णयानंतर बँकिंग यंत्रणेत पारदर्शकता येण्याची अाशा अाहे. अारबीअायने गुरुवारी याबाबतचं परिपत्रक काढलं अाहे. यानुसार, १५ सप्टेंबरपासून जो व्यक्ती डिमांड ड्राफ्ट,  पे ऑर्डर बनवेल त्याचं नाव यावर नोंदवलं जाणार अाहे. काळा पैशाला अाळा घालण्यासाठी अाणि पैसे अफरातफरीवर नियंत्रण अाणण्यासाठी अारबीअायने हे पाऊल उचललं अाहे.


बँकांना  निर्देश 

अारबीअायने सर्व व्यावसायिक बँका,  क्षेत्रीय ग्रामीण बँका, शहरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका, लहान वित्तीय बँका अाणि पेमेंट्स बँकांना हा निर्णय अमलात अाणण्याचे निर्देश दिले अाहेत. अारबीअायने केवायसी नियमांमध्येही बदल केला अाहे. 



हेही वाचा -

सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, ३६ हजार ५४८ वर बंद

नो टेन्शन : अाता पॅन - आधार लिंक करा मार्च २०१९ पर्यंत





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा