Advertisement

सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, ३६ हजार ५४८ वर बंद


सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, ३६ हजार ५४८ वर बंद
SHARES

अाशियाई बाजारातील तेजी, कच्च्या तेलाच्या भावातील घसरण अाणि डाॅलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेली सुधारणा यामुळे गुरूवारी देशातील शेअर बाजार विक्रमी पातळीवर पोहोचले. सेन्सेक्सने ३६ हजार अाणि निफ्टीने ११ हजार अंशांची पातळी ओलांडली.  दिवसाअखेर सेन्सेक्स २८२ अंकाने वधारून ३६ हजार ५४८ वर बंद झाला. तर निफ्टीही ७५ अंकांच्या तेजीने ११ हजार २३ वर स्थिरावला.


दिवसभरात ४०० अंकांची तेजी

सेन्सेक्सची अातापर्यंतची ही विक्रम पातळी अाहे. गुरूवारी दिवसभरात सेन्सेक्सने ४०० अंकांची तेजी नोंदवली होती. मात्र, अखेरच्या तासात मिडकॅप अाणि स्माॅलकॅप शेअर्समध्ये झालेल्या विक्रीने सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकावरून ११८ अंकाने खाली अाला. बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. सुरूवातील बाजारात चौफेर खरेदी झाली. मात्र, त्यानंतर वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकिंग झाल्याने सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण झाली. गुरूवारी बँक, फार्मा अाणि एफएमसीजी शेअर्समध्ये तेजी राहिली.

रिलायन्स बनली १० हजार कोटी डाॅलरची 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा शेअर्स १०९८ रुपयांवर पोहचला. तर दिवसाअखेरीस रिलायन्सचा शेअर्स १०८२  रुपयांवर बंद झाला. बुधवारी कंपनीचा शेअर्स १०३६ रुपयांवर बंद झाला होता. या तेजीमुळे  रिलायन्स इंडस्ट्रीज १० हजार कोटी डाॅलरची कंपनी बनली अाहे. कंपनीचे बाजार भागभांडवल ६.८५ लाख कोटी रुपयांवर गेले अाहे. बुधवारी हे बाजार भाग भांडवल ६.५५ लाख कोटी रुपये होते.



हेही वाचा - 

पत्रकारांना पेन्शन मिळणार, पत्रकार सन्‍मान योजना लवकरच सुरू

नो टेन्शन : अाता पॅन - आधार लिंक करा मार्च २०१९ पर्यंत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा