Advertisement

नो टेन्शन : अाता पॅन - आधार लिंक करा मार्च २०१९ पर्यंत


नो टेन्शन : अाता पॅन - आधार लिंक करा मार्च २०१९ पर्यंत
SHARES

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसंच बँक खाते आणि मोबाइल यासाठी केंद्र सरकारने आधार लिंक बंधनकारक केलं आहे. त्यानुसार पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी जोडण्यासाठीची मुदत ३० जूनला संपली आहे. पण तुम्ही अद्याप पॅन - आधार लिंक केलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. कारण पॅन-आधार लिंक करण्यासाठी आता पुन्हा मुदतवाढ दिली आहे आणि तीही थेट मार्च २०१९ पर्यंत.
 


पाचव्यांदा मुदतवाढ

एलपीजी गॅस अनुदानासह सर्व सरकारी योजनांसाठी आधार सक्तीचं करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा (सीबी़डीटी) ने पॅनकार्ड - आधार लिंक अनिवार्य केलं आहे. पॅन - आधार लिंक नसेल तर कर परताव्यासह अन्य योजनांचा लाभ घेणं अडचणींचं ठरतं. त्यानुसार पॅन - आधार लिंक करण्यासाठी ३० जून २०१८ ही शेवटची मुदत होती. मात्र, या मुदतीतही लिंक न केलेल्यांची संख्या खूप मोठी आहे.  त्यामुळे आता पुन्हा पाचव्यांदा लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता मार्च २०१९ पर्यंत पॅन - आधार लिंक करता येणार आहे. 



हेही वाचा -

जीएसटीला एक वर्ष पूर्ण : जीएसटी योग्य की अयोग्य?

१२५ रुपयांचं नाणं लवकरच बाजारात


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा