Advertisement

पीएमसी बँकेवरील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील (पीएमसी बँक) निर्बंध रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पीएमसी बँकेवरील निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील (पीएमसी बँक) निर्बंध रिझर्व्ह बँकेने  ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

 दरम्यान, बँकेसाठी एक चांगली बातमी आहे. पीएमसी बँकेने मागील महिन्यात इक्विटी भागीदारीच्या माध्यमातून बँकेच्या पुनर्रचनेसाठी संभावित गुंतवणुकदारांकडून प्रस्ताव मागवले होते. प्रस्ताव जमा करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर होती. बँकेची पुनर्रचना आणि बँकेत इक्विटी गुंतवणूक करण्यासाठी ४ कंपन्या पुढे आल्या आहेत.

यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र या कंपन्यांची नावे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली नाहीत.रिझर्व्ह बँक या गुंतवणुकदारांच्या प्रस्तावांचा सध्या अभ्यास करत आहे. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. 

बँकेने रिअल इस्टेट डेव्हलपर एचडीआयएलला नियमबाह्य कर्जे दिली.यामुळे आरबीआयने गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी पीएमसीचे बोर्ड बरखास्त केलं. बँकेतून पैसे काढण्यासह विविध निर्बंध घालण्यात आले होते. सुरुवातीला आरबीआयने ठेवीदारांना १००० रुपये काढण्याची परवानगी दिली, नंतर जून २०२० मध्ये ते वाढवून १ लाख रुपये केले. रिझर्व्ह बँकेने  २२ डिसेंबर २०२० पर्यंत पीएमसीवर  निर्बंध लागू केले होते. आता हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढवले आहेत. 



हेही वाचा -

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा