SHARE

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सोमवारी परवडणाऱ्या घरांच्या कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली आहे. 30 लाखांवरील गृहकर्जाच्या व्याजदरातही थोडीफार कपात केली आहे.

बँकेने जाहीर केलेल्या नव्या गृहकर्ज व्याजदराचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण नव्या दरानुसार गृहकर्जाच्या मासिक हफ्त्यात सुमारे 530 रुपयांची बचत होणार असल्याची माहिती स्टेट बँकेचे राष्ट्रीय बॅंकींगचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी दिली आहे. हे नवे व्याजदर मंगळवारपासून अंमलात येतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या