Advertisement

SBI ची नवी योजना, बिल्डरकडून वेळेत घराचा ताबा न दिल्यास बँक पैसे देणार

बिल्डरने ठरलेल्या वेळेत घराचा ताबा दिला नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना पैसे परत करणार आहे.

SBI ची नवी योजना, बिल्डरकडून वेळेत घराचा ताबा न दिल्यास बँक पैसे देणार
SHARES

बिल्डरने ठरलेल्या वेळेत घराचा ताबा दिला नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना पैसे परत करणार आहे. याबाबत एसबीआयने एक नवीन योजना आणली आहे.

सध्या बांधकाम क्षेत्रात  मंदी आहे.  या क्षेत्राला बळकटी यावी यासाठी एसबीआयने रेसिडेंशल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी या नावाची योजना आणली आहे. या योजनेत घर खरेदी करणाऱ्याला ठरलेल्या वेळेत बिल्डरने घराचा ताबा न दिल्यास ग्राहकाला एसबीआय गृह कर्जाचे पैसे परत करणार आहे. बिल्डरला ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळत नाही तोपर्यंत ही रिफंड स्कीम लागू राहील. एसबीआयच्या या योजनेत ग्राहकांना 2.5 कोटी रुपयांपर्यंत घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज मिळेल. याशिवाय बँकेच्या नियमांचे पालन करणाऱ्या बिल्डरलादेखील या योजनेत ५० कोटी ते ४०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

बिल्डरने ठरलेल्या वेळेत घराचा ताबा दिला नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना पैसे परत करणार आहे. या योजनेअंतर्गत एसबीआयने नुकतेच मुंबईच्या सनटेक डेव्हलोपर्ससोबत तीन प्रकल्पांचा करार केला आहे. योजनेबाबत एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, या योजनेचा बांधकाम क्षेत्राला फायदा होईल. याशिवाय घर खरेदी केल्यानंतर काही बिल्डर ठरलेल्या वेळेत घराचा ताबा ग्राहकांना देत नाहीत, त्यामुळे लोकांचे पैसे अडकतात. अशा लोकांसाठी देखील ही स्कीम महत्त्वाची आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा