Advertisement

पालिकेतही 'कॅशलेस'ला सुरुवात


पालिकेतही 'कॅशलेस'ला सुरुवात
SHARES

मुंबई - पंतप्रधान मोदींनी दिलेल्या नोटबंदीच्या घोषणेनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होण्यास सुरूवात झाली असताना आता मुबंई महानगरपालिकेतही कॅशलेस व्यवहाराला सुरुवात होणार आहे. यापुढे दुकान आणि आस्थापना खात्याशी संबंधित विविध व्यवहार करण्यासाठी 'फक्त ऑनलाइन' पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय. लवकरच याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यासाठी महापालिकेच्या आस्थापना खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. तसेच नोंदणी झाल्यावर नूतनीकरण करणे, नोंदणी विषयक माहितीमध्ये बदल करणे, यासाठी आतापर्यंत महापालिकेच्या विभाग कार्यालयात जाऊन नोंदणी, नूतनीकरण वा बदल विषयक कार्यवाही करावी लागत होती. मात्र आता या सर्व बाबी फक्त कॅशलेस म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा