Advertisement

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूक वाढली, एसबीआयचा खातेधारकांना अलर्ट

ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून भारतीय स्टेट बँकने आपल्या ४२ कोटी खातेधारकांना अलर्ट केलं आहे.

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूक वाढली, एसबीआयचा खातेधारकांना अलर्ट
SHARES
कोरोना संकट काळात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. फसवणूक होऊ नये म्हणून भारतीय स्टेट बँकने आपल्या ४२ कोटी खातेधारकांना अलर्ट केलं आहे.  एसबीआय त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावधान राहण्याचा इशारा देत आहे.


एसबीआयने आता ट्वीट करून आपल्या खातेधारकांना ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. एसबीआयने या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, वित्तीय सेवा क्षेत्र नेहमी सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर आहे. जर तुम्हाला असे फ्रॉड कॉल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज येत असतील, ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्यासाठी सांगण्यात येईल किंवा तात्काळ पैसे देण्याची मागणी केली जाईल. जर तुमच्या बँक खात्यामध्ये असा कोणताही व्यवहार झाला आहे, जो तुम्ही नाही केली आहे किंवा तुम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग डिटेल्स शेअर केले आहेत किंवा तुम्हा कोणत्या सायबर हल्ल्याला बळी पडला असाल तर याची सूचना स्थानिक पोलीस आणि सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in/ यांना देऊ शकता.



याशिवाय एसबीआयने खातेधारकांना बँकिंग व्यवहारांसाठी स्ट्राँग पासवर्ड बनवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे हा पासवर्ड वेळोवेळी बदलणे गरजेचं असल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पासवर्ड तुमच्या आप्तेष्टांचं नाव नसावं, अन्यथा त्यांचे खाते देखील धोक्यात येऊ शकेल. याप्रकारच्या पासवर्डचा अंदाज बांधणे हॅकर्ससाठी सोपं असतं. 



हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा