Advertisement

एसबीआय देणार 45 मिनिटांत मिळणार 5 लाखांचं कर्ज, 6 महिने ईएमआय नाही

एसबीआय कमी व्याज दरावर 5 लाख रुपयांचं कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून या कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.

एसबीआय देणार 45 मिनिटांत मिळणार 5 लाखांचं कर्ज, 6 महिने ईएमआय नाही
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. घरी बसावं लागल्यामुळे अनेकांच्या हातात खर्च करण्यासाठीही पैसे नाहीत. काही लोकांचे जगणंही कठीण झालं आहे. मात्र,  अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) पुढं आली आहे. एसबीआय कमी व्याज दरावर 5 लाख रुपयांचं कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून या कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर केवळ 45 मिनिटांत कर्ज मिळणार आहे. 

आपण कोणत्याही वेळी एसबीआयकडून वैयक्तिक आपत्कालीन कर्ज घेऊ शकता. या कर्जासाठी एसबीआय 7.25 टक्के दराने व्याज आकारणार आहे.  या कर्जावर पहिल्या सहा महिन्यांसाठी  मासिक हप्ताही देण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे कर्ज मे महिन्यात  घेत असाल तर तुम्हाला त्यासाठी ऑक्टोबरपर्यंत कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही. कर्ज घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुमचा ईएमआय सुरू होईल .

कर्जासाठी असा करा अर्ज

- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून PAPL टाइप करून स्पेस द्या, त्यानंतर तुमच्या अकाउंट नंबरचे शेवटचे 4 आकडे टाइप करा, हा मजकूर 567676 वर एसएमएस करा.

- जर बॅंकेच्या वतीनं तुमची सर्व माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला 4 प्रोसेसमध्ये कर्ज मिळू शकेल.

-  एसबीआयच्या YONO SBI या अॅपच्या माध्यमातूनही कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी अॅपमध्ये असलेल्या Avail Now option वर क्लिक करा.

- त्यानंतर कर्जाची रक्कम आणि अकाउंट नंबर सिलेक्ट करा.

- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP क्रमांक येईल. हा OTP क्रमांक अनिवार्य जागी टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये त्वरित कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.


हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा