Advertisement

एसबीआयकडून गृहकर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ

एसबीआय गृह कर्जाच्या ०.४० टक्के प्रक्रिया शुल्क आकारते. १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ केल्याने कर्जदारांची मोठी बचत होणार आहे.

एसबीआयकडून गृहकर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आपल्या  गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. मॉन्सून धमाका योजनेत १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय एसबीआयने घेतला आहे. 

प्रक्रिया शुल्क माफीची सवलत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरु राहील, असं एसबीआयने म्हटलं आहे. एसबीआय गृह कर्जाच्या  ०.४० टक्के प्रक्रिया शुल्क आकारते. १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ केल्याने कर्जदारांची मोठी बचत होणार आहे.

योनो ऍपवरून गृह कर्जासाठी अर्ज केल्यास कर्जदाराला आणखी ०.०५ टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याशिवाय महिला कर्जदाराला अतिरिक्त ०.०५ टक्के व्याजदर सवलत असेल, असे बँकेने म्हटलं आहे.

स्टेट बँकेचा गृह कर्जदर हा ६.७० टक्के इतका कमी आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सीएस शेट्टी म्हणाले की, आम्ही मान्सून धमाका ऑफर सुरू केली आहे. प्रक्रिया शुल्क माफ केल्याने बँकेकडून गृहकर्ज घेणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

सध्या कोटक महिंद्रा बँक सर्वात स्वस्त गृह कर्ज देत आहे. बँकेचा व्याजदर ६.६५ टक्के आहे. तर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे गृहकर्जाचे व्याज दर ६.६६ टक्के पासून सुरू होतात. सध्या अनेक बँका ७ टक्केपेक्षा कमी दराने गृहकर्ज देत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा