Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

घरगुती जेवणासाठी स्विगीचं नवं अॅप

टिफिन सर्विस असणाऱ्यांसाठी किंवा सुरू करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

घरगुती जेवणासाठी स्विगीचं नवं अॅप
SHARES

घरबसल्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली आहे. टिफिन सर्विस असणाऱ्यांसाठी किंवा सुरू करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. स्विगीनं या व्यवसायासाठी एका अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपचे ‘स्विगी डेली’ असं नाव आहे. या अॅपद्वारे सामान्य घरात बनवले जाणारे जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवलं जाणार आहे.

यासाठी तुम्हाला चांगले जेवण घरीच बनवून ते स्विगीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवता येणार आहे. ५० ते १०० रुपयांपर्यंत ‘स्विगी डेली’ने घरी बनवलेल्या या जेवणाची किंमत ठेवली आहे. हे अॅप ३ दिवस, ७ दिवस किंवा संपूर्ण एक महिन्यासाठी सब्सक्राईब करता येणार आहे.

संघटित विक्रेते, घरगुती स्वयंपाकी आणि टिफिनची सेवा देणारे लोक ‘स्विगी डेली’च्या मदतीने घरी बनवलेले जेवण वितरण करण्यास सक्षम होतील. याशिवाय परवडणाऱ्या किंमतीत, लोकांची घराच्या जेवणाची गरज ‘स्विगी डेली’ अॅप या सुविधेमुळे पूर्ण करतील.

सध्या ही सेवा फक्त गुरुग्राममध्ये सुरू केली आहे. गुरुग्राममध्ये सुरू झालेल्या या सेवेचा येणाऱ्या महिन्यात इतर शहरांतही विस्तार केला जाणार आहे.

प्रत्येक प्रकारच्या जेवणासाठी ‘स्विगी डेली’ अॅपवर ३० हून अधिक पर्याय उपलब्ध असतील. यात Homely, Lunchly, Fig, iDabba आणि Caloriesmart यांसारख्या संघटित विक्रेत्यांना सामिल केलं जाईल.

त्याचबरोबर Dial a Meal आणि Dailymeals.in सारख्या लोकप्रिय टिफिन सेवांनाही यात सामिल करून घेतलं जाणार आहे. ग्राहकांना ‘स्विगी डेली’द्वारे Sumita’s Food Planet, Mrs. Ahmed’s Kitchen आणि Shachi Jain अशा एक्सपर्ट होम शेफच्या पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा