Advertisement

मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार, 'हे' आहे कारण

आपल्या सर्वांचे मोबाइल नंबर 10 अंकांचे असतात. मात्र, आता मोबाइल नंबर 11 अंकांचे असणार आहेत.

मोबाईल नंबर आता 11 अंकी होणार, 'हे' आहे कारण
SHARES

आपल्या सर्वांचे मोबाइल नंबर 10 अंकांचे असतात. मात्र, आता मोबाइल नंबर 11 अंकांचे असणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (ट्राय) यासंदर्भात शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, मोबाइल नंबर 10 ऐवजी 11 अंकी असतील.

10 ऐवजी 11 अंकी मोबाइल नंबर वापरला तर जास्त फोन नंबर उपलब्ध होतील, असं ट्रायचं म्हणणं आहे. फिक्स लाईनसाठी फोन करताना मोबाइल नंबर आधी शुन्य लावण्यात यावा असंही सांगितलं आहे. देशांतर्गत मोबाइंल फोनद्वारे संवाद साधण्यासाठी नंबर आधी शून्य लिहून नंबर डायल करणं आता आवश्यक असेल.

देशात सध्या 10 आकड्यांचे 210 कोटी कनेक्शन आहेत. जे 7, 8 आणि 9 नंबरने सुरु होतात.  फिक्स्ड नेटवर्कमधून मोबाइलवर कॉल करण्यासाठी शून्य वापरणं अनिवार्य झाल्यानंतर 2, 3, 4 आणि 6 स्तरावर फ्री सब-लेवल्स मोबाईल नंबर म्हणून वापरता येऊ शकतात, असं ट्रायने म्हटलं आहे.

याशिवाय ट्रायनं नवीन राष्ट्रीय नंबर योजना सुचवली आहे. ही योजना लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. डोंगल वापरणाऱ्यांसाठी 13 तर मोबाईल धारकांसाठी 11 अंकी नंबर असेल असंही ट्रायने म्हटलं आहे.



हेही वाचा -

मधुमेह रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा