Advertisement

Gold Loan: 'ह्या' बँका देत आहेत सर्वात कमी व्याजदरावर गोल्ड लोन

आपत्कालीन परिस्थितीत रोख रकमेची गरज भागवण्यासाठी गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) हा उत्तम पर्याय आहे. गोल्ड लोन मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर किंवा कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही.

Gold Loan: 'ह्या' बँका देत आहेत सर्वात कमी व्याजदरावर गोल्ड लोन
SHARES

आपत्कालीन परिस्थितीत रोख रकमेची गरज भागवण्यासाठी गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) हा उत्तम पर्याय आहे. गोल्ड लोन मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर किंवा कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणीही हे कर्ज घेऊ शकते. बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) गोल्ड लोन देतात. इन्स्टंट पैसे मिळविण्यासाठी हे कर्ज सर्वात स्वस्त दराने आणि सहज उपलब्ध होते. 

गोल्ड लोनची वैशिष्ट्ये 

१) कार्यकाळः साधारणत २ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गोल्ड लोन दिले जाते आणि त्या कालावधीनंतर आपण कर्जाचे नूतनीकरण करू शकता.

२) तारण: हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला सोने (कोणत्याही स्वरूपात, दागदागिने, बार किंवा नाणे) तारण ठेवावे लागते. सोन्याच्या किंमतीच्या ८० टक्के बँका कर्ज देतात.

३) परतफेड: या कर्जाच्या बाबतीत तुम्हाला परतफेडीचा सोयीचा पर्याय मिळेल. आपण एकतर ईएमआय पर्याय निवडू शकता किंवा पूर्ण रक्कम परतफेड करू शकता.  आंशिक परतफेड पर्याय देखील उपलब्ध आहे.

४) क्रेडिट स्कोअर: या कर्जाचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोर असण्याची गरज नाही. पण तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर स्वस्त दरात  कर्ज मिळू शकते.

५) कागदपत्रे: कर्ज घेण्यासाठी फारच कमी कागदपत्रे आवश्यक आहेत. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त ओळख आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे.

६) व्याज दरः  या कर्जाचा व्याज दर वैयक्तिक कर्जापेक्षा कमी आहे. आपला जॉब प्रोफाइल आणि क्रेडिट स्कोअर किती आहे यावर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. सध्या वैयक्तिक कर्जाचा व्याज दर १० ते १५ टक्के आहे. मात्र गोल्ड लोनचा व्याजदर ७ टक्क्यापासून सुरू होत आहे.  देशातील अशा पाच बँका आहेत ज्या गोल्ड लोनवर सर्वात कमी व्याज दर आकारतात.

बँक                              व्याज दर

पंजाब आणि सिंध बँक             ७ टक्के

बँक ऑफ इंडिया                    ७.३५ टक्के

भारतीय स्टेट बँक                   ७.५ टक्के

कॅनरा बँक                           ७.६५ टक्के 

युनियन बँक                         ८.२ टक्के

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा