बेस्ट प्रवासही आता कॅशलेस

 Pali Hill
बेस्ट प्रवासही आता कॅशलेस

मुंबई – नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय. त्यामुळेच सध्या रिक्षावाले-भाजीवाले अगदी चहावालेही कॅशलेस व्यवहार करत आहेत. अशावेळी मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन अशी ओळख असणारी बेस्ट कशी मागे राहिल. बेस्टनंही आता मुंबईकरांना कॅशलेस प्रवासाची सोय उपलब्ध करून दिलीय. रिडलर्स नावाच्या अॅपच्या मदतीनं आता बेस्टचं तिकीट काढता येऊ शकतं. हे अॅप डाऊनलोड करा आणि बेस्टचं तिकीट, पासचं नूतनीकरण डिजीटल पेमेंटनं करा. या सेवेला शनिवारपासून सुरुवात झालीय. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बेस्टनं दिलीय. तर हे अॅप अधिकाधिक प्रवाशांनी डाऊनलोड करत कॅशलेस प्रवास करावा यासाठी आता बेस्ट प्रयत्न करत आहे.

Loading Comments