Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

युनियन बँक सुरू करणार १२५ प्रादेशिक कार्यालय

युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच आंध्र बँक आणि आणि काॅर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेत विलिनीकरण झालं होतं.

युनियन बँक सुरू करणार १२५ प्रादेशिक कार्यालय
SHARES

युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची (union bank of india announced to open 125 regional office in india ) घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच आंध्र बँक आणि आणि काॅर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेत विलिनीकरण झालं होतं. या विलिनीकरणानंतर आता युनियन बँकेने प्रादेशिकरणाचा महत्त्वाचा टप्पा हाती घेतला आहे.

यासंदर्भात युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय म्हणाले, १ एप्रिल २०२० रोजी आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये यशस्वीरित्या एकत्रिकरण झालं आहे. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचं नेटवर्क संपूर्ण देशभरात ९५०० हून अधिक शाखा आणि १३,५०० हून अधिक एटीएम याद्वारे विस्तारलं आहे. या एकत्रिकरणानंतर युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. तर देशातील प्रत्येक राज्यात शाखा आसलेल्या चौथ्या क्रमांकाचं बँकिंग नेटवर्क तयार झालं आहे. आता पुढचा टप्पा म्हणून युनियन बँकेने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याचं ठरवलं आहे.

हेही वाचा - खूशखबर! SBI मध्ये ४४५ पदांसाठी भरती

एकत्रित संस्थांचं मध्यवर्ती कार्यालय (सीओ) हे त्याच्या पूर्वीच्याच मुंबईतील नरीमन पॉइंट येथील मुख्यालयात असेल. या मध्यवर्ती कार्यालयाला १८ विभागीय आणि १२५ प्रादेशिक कार्यालये सहाय्य करतील.

१२५ पैकी ३३ प्रादेशिक कार्यालये अमृतसर, आनंद, भागलपूर, अनंतपूर, राजामुंद्री, सिमला, अमरावती इत्यादी संपूर्णपणे नवीन ठिकाणी आहेत. नव्या कार्यलयांकडून तेलंगना, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या पारंपरिक राज्यातील बँकेचे कमांडींग मार्केट शेअर अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. एवढंच नव्हे तर गुवाहटी, सिलिगुडी, दुर्गपूर इत्यादीसारख्या प्रादेशिक कार्यालयांच्या अस्तित्वाद्वारे विशेषत: ईशान्य भारतासह संपूर्ण देशात आपले अस्तित्व विस्तारण्याचे उद्दिष्ट यामागे आहे, असंही राय म्हणाले.

हेही वाचा - लाॅकडाऊनमुळे ७८ टक्के सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ठप्प

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा