Advertisement

खूशखबर! SBI मध्ये ४४५ पदांसाठी भरती

या पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

खूशखबर! SBI मध्ये ४४५ पदांसाठी भरती
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडेर पदाच्या ४४५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १३ जुलै आहे. या पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडेर पदासाठी अर्ज भरण्यास २३  जूनपासून सुरूवात झाली आहे. एसबीआयच्या sbi.co.in  या वेबसाईटवरून इच्छुकांना अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी ओळखपत्र, वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र आणि अनुभव प्रमाणपत्राची गरज लागेल. जर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले तर त्यावेळी मुळ कागदपत्र देखील नेणं आवश्यक आहे. 


अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ७५० रुपये अर्ज फी द्यावी लागेल. एससी, एसटी आणि PwD उमेदवारांना शुल्क आकारलं जाणार नाही. sbi.co.in या लिंकवर क्लिक करून एसबीआयने विविध पदांसाठी जारी केलेल्या नोटिफिकेशन संदर्भात माहिती मिळेल.


कसा कराल अर्ज?

- sbi.co.in या वेबसाइटवरील रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावे

- नवीन पेज उघडल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला लॉगइन किंवा रजिस्ट्रेशन करावं लागेल

- त्या ठिकाणी असणारा अर्ज भरून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायची आहे

- त्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा

- त्याची हार्ड कॉपी पुढील प्रक्रियांसाठी तुमच्याकडे ठेवून द्या



हेही वाचा -

Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम

Coronavirus Pandemic: मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा