Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

बजेट २०२०: नोकरदारांना मोठा दिलासा, ‘अशी’ आहे नवीन कररचना


बजेट २०२०: नोकरदारांना मोठा दिलासा, ‘अशी’ आहे नवीन कररचना
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (union finance minister nirmala sitharaman) यांनी सर्वसामान्य करदात्यांना (income tax slabs) दिलासा देत नवी करप्रणाली लागू करण्यात येणार असल्याचं शनिवारी जाहीर केलं आहे. त्यानुसार ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला यापुढे कुठलाही प्राप्तिकर (income tax) द्यावा लागणार नाही. या अगोदर ही मर्यादा २.५ लाख होती. आता ती वाढून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (union finance minister nirmala sitharaman) यांनी शनिवार केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२०२१ (union budget 2020-2021) सादर करताना कररचनेत मोठे बदल केले आहेत. चालू आर्थिक वर्षात २.५ लाख रूपये ते ५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना (tax payers) ५ टक्के प्राप्तिकर (income tax) द्यावा लागत होता. पण नव्या आर्थिक वर्षात करदात्यांना ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

 

सोबतच ५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना २० टक्के प्राप्तिकर (income tax) द्यावा लागत होता. परंतु नव्या कररचनेनुसार ५ लाख ते ७.५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करदात्यांना १० टक्के प्राप्तिकर आणि ७.५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के प्राप्तिकर आकारण्यात येणार आहे. या कररचनेचे दोन भाग करण्यात आल्याने करदात्यांना (tax payers) दिलासा मिळणार आहे.

 

आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना करदात्यांना (tax payers) ३० टक्के प्राप्तिकर (income tax) द्याला लागत होता. या कररचनेतही ३ भाग पाडण्यात आले आहेत. त्यानुसार १० ते १२.५ लाख रूपये उत्पन्न असणाऱ्यांना आता २० टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल. तर १२.५ ते १५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता २५ टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल. १५ लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे ३० टक्के प्राप्तिकर भरावा लागेल.

 

नवी करप्रणाली याप्रमाणे

  • ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
  • ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
  • ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार
  • १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार
  • १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
  • १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा