Advertisement

विजय माल्याचा कांगावा, लाॅकडाऊनमुळे नुकसान झाल्याने सरकारकडं भरपाईची मागणी

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपये बुडवून भारतातून पळून गेलेला किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने आता कांगावा करत लॉकडाऊनबाबत तक्रारीचा सूर लावला आहे.

विजय माल्याचा कांगावा, लाॅकडाऊनमुळे नुकसान झाल्याने सरकारकडं भरपाईची मागणी
SHARES

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपये बुडवून भारतातून पळून गेलेला किंगफिशरचा मालक विजय माल्ल्याने आता कांगावा करत लॉकडाऊनबाबत तक्रारीचा सूर लावला आहे. लाॅकडाऊनने झालेल्या नुकसानीमुळे सरकारने मदत करावी अशी मागणी त्याने केली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत माल्याने ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये त्याने पुन्हा एकदा 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची भाषा केली आहे. भारत सरकार आणि ईडी त्याची मदत करत नाही आहेत. भारतामध्ये सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. कोणालाच वाटलं नव्हतं की असं काही होईल. या निर्णयाचा मी सन्मान करतो. पण यामुळे माझ्या सर्व कंपन्या ठप्प झाल्या आहेत. सर्वप्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग बंद झाले आहे. अस असून देखील आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले नाही आहे आणि त्याची किंमत मोजत आहोत. सरकारने आमची मदत करणे अपेक्षित आहे, असं माल्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



हेही वाचा -

राज्यात २१ ते ३० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा