Advertisement

पैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल?

पैशाचे हस्तांतरण करणं सोपं झालं असलं तरी त्यामध्ये चुका देखील होत आहेत. कधीकधी खाते क्रमांक टाइप करण्यात चूक होते आणि आपण पाठविलेले पैसे दुसर्‍या खात्यात जातात.

पैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल?
SHARES

तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल बँकिंग किंवा ऑनलाइन बँकिंगचा समावेश असलेल्या बँकिंग सेवा देखील सुलभ झाल्या आहेत. सध्याच्या युगात डिजिटल वॉलेट, एनईएफटी / आरटीजीएस, यूपीआय, गुगल पे, भीमा अॅप आणि इतर सेवांद्वारे पैसे पाठविणे खूपच सोपं झालं आहे. आहे. ही सर्व माध्यमे पैसे पाठविण्याचा किंवा प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहेत. कोट्यावधी लोक या माध्यमांचा वापर करतात.

या सुविधांमुळे पैशाचे हस्तांतरण करणं सोपं झालं असलं तरी त्यामध्ये चुका देखील होत आहेत. कधीकधी खाते क्रमांक टाइप करण्यात चूक होते आणि आपण पाठविलेले पैसे दुसर्‍या खात्यात जातात. आपण चुकीने टाइप केलेला बँक खाते क्रमांक बँक डेटामध्ये उपलब्ध नसल्यास सर्व पैसे आपल्या बँक खात्यात परत केले जातात. परंतु जर खाते क्रमांक बँकेच्या डेटामध्ये असेल तर ते पैसे ज्याच्याकडे आपण चुकून पाठविले त्या व्यक्तीच्या खात्यावर पोहोचेल. अशा परिस्थितीत आपण काय करावे हे जाणून घेणं आवश्यक आहे.  

सर्वप्रथम शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधा

तुम्ही प्रथम तुमच्या बँकेला मेलद्वारे कळवावे किंवा बँकेत त्वरित संपर्क साधावा. जर काही प्रकरणात आपले पैसे दुसर्‍या बँकेत किंवा शाखेत अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यावर पोचले असतील तर अशा परिस्थितीत फक्त ती बँक ही समस्या सोडवू शकते. आपण प्रथम आपल्या बँकेच्या शाखेत माहिती द्या. व्यवस्थापकास खाजगीरित्या भेटा. अशा परिस्थितीत आपल्याला पैसे पाठविण्याची ची तारीख, पाठविण्याची वेळ, आपला खाते क्रमांक आणि पैसे घेणार्‍याचा खाते क्रमांक सांगावा लागेल.

कायदेशीर कारवाई

आपल्याकडे कायदेशीर कारवाईचा पर्याय देखील आहे. काही परिस्थितीत, बँकेने विचारले असता, चुकून पैसे मिळालेल्या व्यक्ती पैसे परत देण्यास तयार असतात. परंतु जर पैसे घेणारी व्यक्ती पैसे पाठविण्यास नकार देत असेल तर बँक कायदेशीर कारवाई करू शकते आणि खातेदारांविरूद्ध गुन्हा दाखल करू शकते. अशा प्रकरणांमध्ये आपल्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा देखील आपल्याला अधिकार आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण स्वतः सावधगिरी बाळगणं चांगलं.

तक्रार

ज्या व्यक्तीच्या खात्यावर चुकून पैसे गेले आहेत त्या व्यक्तीचे ज्या शाखेत खातं आहे त्या शाखेत त्वरित तक्रार करा. जोपर्यंत ग्राहकांची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत कोणतीही बँक आपल्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. बँका त्यांच्या ग्राहकांविषयी माहिती शेअर करत नाहीत. म्हणूनच, जर तुम्ही संबंधित बँकेकडे किंवा शाखेत तक्रार केली तर अशा परिस्थितीत बँक ग्राहकांना ओळखेल आणि चुकून त्याला पाठविलेले पैसे परत देण्यास सांगेल.

बँक सूचना देते

 आपण आपल्या बँक खात्यातून दुसर्‍याच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले तर आपल्याला एक संदेश मिळेल. जर व्यवहार चुकीचा असेल तर कृपया या क्रमांकावर हा संदेश पाठवा असं त्यामध्ये सांगितलं जातं. आरबीआयने बँकांना सूचनाही दिल्या आहेत की जर चुकून पैसे दुसर्‍याच्या खात्यात जमा झाले तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर पावले उचलावी लागतील. चुकीच्या खात्यातून तुमचे पैसे योग्य खात्यात परत करण्यास बँक जबाबदार आहे.हेही वाचा -

केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार ५५५० कोटी

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरुसंबंधित विषय
Advertisement