अपना बाजार स्वीकारतंय पाचशेची नोट

सीएसटी - अपना बाजार... मुंबई मध्यवर्ती सहकारी संस्थेशी संलग्न असणाऱ्या या बाजारात 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातायेत. त्यामुळे इथं ग्राहकांची गर्दी होतेय. इथं तुम्ही फक्त पाच हजारांपर्यंतचीच खरेदी करू शकता. याशिवाय खरेदीसाठी तुम्हाला सरकारी मान्यता असलेला पत्त्याचा पुरावाही दाखवावा लागेल आणि त्यानंतरच पैसे स्वीकारले जातील. आबालवृद्धही या सुविधेचा फायदा घेतायेत. अपना बाजारनं पुढे केलेला हा मदतीचा हात ग्राहकांच्या पसंतीला उतरतोय, हे मात्र नक्की.

Loading Comments