Advertisement

झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्तांचा राजीनामा

अनेकांना त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे.

झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्तांचा राजीनामा
SHARES

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. फूड डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही झोमॅटोनं सुरू केली होती. झोमॅटोनं नुकतीच किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

एक मेल पाठवत कंपनी सोडत असल्याचं गौरव गुप्ता यांनी जाहीर केल्याचं मनीकंट्रोलनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. कंपनीत सहा वर्षे टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून घालवल्यानंतर आता एक नवीन सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आपल्या मेलमध्ये नमूद केलं.

पुढे ते म्हणाले, झोमॅटोच्या प्रेमात मी आहे आणि नेहमीच राहणार आहे. इथं सहा वर्षापूर्वी येताना पुढे काय होईल हे देखील माहिती नव्हते. आतापर्यंतचा प्रवास खरंच आश्चर्यकारक होता आणि मला याचा अभिमान वाटतो.

माझ्या आयुष्यातील एका नवीन वळणावर मी आहे. एक नवीन अध्याय मी सुरू करत आहे. गेल्या ६ वर्षात बरच काही शिकायला मिळाले. आमच्याकडे झोमॅटोला पुढे नेण्यासाठी चांगली टीम आहे. माझ्या प्रवासात आता पर्यायी मार्ग शोधण्याची ही योग्य वेळ आहे. हे लिहीताना मी खूप भावुक आहे आणि मला आता काय वाटत आहे, हे मी शब्दात सांगू शकत नसल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं.

त्यांच्या योगदानाबद्दल झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्वीट करून आभार मानले आहेत. गौरव गुप्ता यांचे सहा वर्षे कंपनीला चांगले मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी लिहिलं आहे.

स्टार्ट-अपची काही दिवसांपूर्वीच जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. ही पहिली स्टार्ट-अप कंपनी आहे, ज्यानं आयपीओमधून ९ हजार कोटी रुपये कमावले आहेत. गौरव गुप्ता यांनी कंपनीच्या आयपीओ प्रक्रियेदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती.



हेही वाचा

Zomatoची ग्रॉसरी सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद, 'हे' आहे कारण

UAN-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, 'ही' आहे शेवटची तारीख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा