Advertisement

Zomatoची ग्रॉसरी सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद, 'हे' आहे कारण

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato किराणा सामान देण्याची सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद करणार आहे.

Zomatoची ग्रॉसरी सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद, 'हे' आहे कारण
SHARES

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ग्रॉसरी सेवा येत्या १७ सप्टेंबरपासून बंद करणार आहे. खासकरुन हा निर्णय कंपनीनं कमी ऑर्डर आणि खराब कंज्युमर रिव्हूमुळे घेतला आहे. दुसऱ्यांदा झोमॅटोवर ग्रॉसरी सेवा बंद करण्याची वेळ आली आहे.

तर गेल्याच वर्षात याची घोषणा करण्यात आली. जून महिन्यात पायलट ग्रॉसरी सेवा सुरू केली गेली. त्यावेळी कंपनीनं निवडक मार्केटमध्ये फक्त ४५ मिनिटांत ग्रॉसरी सेवा देण्याचं जाहीर केलं होतं.

जेव्हा देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, तेव्हा कंपनीनं या ग्रॉसरी सेवेची सुरुवात केली. कंपनीला असं वाटत होतं की, ग्रॉसरी डिलिव्हरीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जाईल. पण तसं न झाल्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीनं असं म्हटलं आहे की, त्यांना विश्वास आहे ग्रोफर्समध्ये करण्यात आलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरणार आहे. अशातच कंपनीनं आपल्या स्वत:च्या ग्रॉसरी सेवेला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कडून १०० मिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास ७४५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याच प्रकारे झोमॅटोनं ग्रोफर्समधील सुद्धा काही भाग खरेदी केला आहे.

दरम्यान, आपल्या एक्सप्रेस डिलिव्हरी मॉडेलवर झोमॅटो आपलं पूर्ण लक्ष देणार आहे. त्यानुसार आता कंपनी अवघ्या १५ मिनिटांत खाद्यपदार्थंची डिलिव्हरी करणार आहे. त्याचसोबत मार्केटपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना फूडची डिलिव्हरी केली जाणार आहे. याबद्दल कंपनीनं आपल्या ईमेल स्टेटमेंटमध्ये घोषणा केली आहे.



हेही वाचा

स्विगी, झोमॅटो, ओला, उबेरनं थकविलं ३.६ कोटींचं इ-चलान

स्विगी, झोमॅटोवरून जेवण मागवताय? मग हे वाचाच...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा