Advertisement

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी १० नवे रुग्ण

डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी ३७ रुग्ण हे पुरुष असून ३९ स्त्रिया आहेत. या ७६ रुग्णांपैकी १० जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर १२ जणांनी केवळ १ डोस घेतलेला आहे.

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी १० नवे रुग्ण
SHARES

राज्यात डेल्टा प्लसच्या आणखी १० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या आता ७६ झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  

इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेने सोमवारी राज्यात आणखी १० डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले. त्यापैकी ६ रुग्ण हे कोल्हापूर जिल्ह्यातील, ३ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील आणि १ रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे हे दहाही रुग्ण कोविडमधून पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसेच राज्यात आढळलेल्या डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी ३७ रुग्ण हे पुरुष असून ३९ स्त्रिया आहेत. या ७६ रुग्णांपैकी १० जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर १२ जणांनी केवळ १ डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी दोन व्यक्तींनी कोवॅक्सिन आणि इतरांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे.

डेल्टा प्लसबाधितांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीतील २ आणि मुंबई, बीड व रायगड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजारही होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेले होते, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती आणि मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा