Advertisement

मुंबईतील कोरोनाबाधितांनी ओलांडला १००० चा टप्पा

मुंबईतील कोरोनाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या पलिकडे गेली आहे. तर २१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्याही १५७४ वर गेली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांनी ओलांडला १००० चा टप्पा
SHARES

मुंबईतील कोरोनाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या पलिकडे गेली आहे. तर २१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्याही १५७४ वर गेली आहे. 

राज्याच्या आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १००८ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. दिवसभरात मुंबईत १३२ नवीन रुग्णांची भर पडली असून १० जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ६४ वर जाऊन पोहोचला आहे. 

त्याखालोखाल २१९ कोरोनाबाधित रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात दिवसभरात ३८ नवे रुग्ण दाखल झाले, तर एकाचा मृत्यूही झाला. पुण्यात आतापर्यंत २५ जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये २२, पुणे ग्रामीण ७, ठाणे २८, कल्याण-डोंबिवली ३४, नवी मुंबईत ३२, वसई-विरार १२, मिरा-भाईंदर २१, पनवेल ६, ठाणे ३, उल्हासनगर १, पालघर ३, रत्नागिरी ५, यवतमाळ ४, सातारा ६, सांगली २६, नागपूर २५, अहमदनगर शहर १६, अहमदनगर ग्रामीण ९, बुलढाणा १३, औरंगाबाद १६, औरंगाबाद ग्रामीण १, लातूर ८, उस्मानाबाद ४, कोल्हापूर ५, नाशिक शहर १, नाशिक ग्रामीण १, जळगाव शहर १, जळगाव ग्रामीण १, जालना १, हिंगोली १, वाशिम १, गोंदिया १, अमरावती ४, मालेगाव ५, अकोला १२, बीड १, सिंधुदुर्ग १, इतर ९ असे एकूण १५७४ रुग्ण झाले आहेत.

महाराष्ट्रातील एकूण रुग्णांपैकी ४८ कोरोनाबाधित रुग्ण हे १ ते १० वयोगटातील आहेत,  १०५ कोरोनाबाधित रुग्ण हे ११ ते २० वयोगटातील आहेत, ३१६ कोरोनाबाधित रुग्ण हे २१ ते ३० वयोगटातील आहेत, २९१ कोरोनाबाधित रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत, ३२१ कोरोनाबाधित रुग्ण हे ४१ ते ५० वयोगटातील आहेत, २४२ कोरोनाबाधित रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत, १५७ कोरोनाबाधित रुग्ण हे ६१ ते ७० वयोगटातील आहेत, ६२ कोरोनाबाधित रुग्ण हे ७१ ते ८० वयोगटातील आहेत, १८ कोरोनाबाधित रुग्ण हे ८१ ते ९० वयोगटातील आहेत, ४ कोरोनाबाधित रुग्ण हे ९१ ते १०० वयोगटातील आहेत, तर १ कोरोनाबाधित रुग्ण हा १०० ते ११० वयोगटातील आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा