Advertisement

Mira-Bhayandar- मिरा-भाईंदरमध्ये ११६ नवे कोरोनाबाधित रुग्ण, चौघांचा मृत्यू

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) मध्ये रविवारी COVID-19 चे ११६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Mira-Bhayandar- मिरा-भाईंदरमध्ये ११६ नवे कोरोनाबाधित रुग्ण, चौघांचा मृत्यू
SHARES

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) मध्ये रविवारी COVID-19 चे ११६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, मिरा-भाईंदर महानगरपालिके (MBMC) ने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.(116 new covid 19 cases and 4 died in mira bhayandar on sunday) 

मिरा-भाईंदर मध्ये आतापर्यंत COVID-19 चे एकूण ३०५१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. तर आतापर्यंत १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय रविवारी १६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत शहर परिसरात २०८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मिरा-भाईंदर महानगरपालिके (MBMC) ने महापालिका परिसरात २२ एप्रिलपासून सातत्याने कडक लाॅकडाऊन लागू केला होता. या लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना अत्यावश्यक गरजेशिवाय इतर कुठल्याही कामांसाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव केला होता. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने सक्तीने बंद ठेवण्यात आली होती. दूध, किराणा, भाजीपाला, इतर अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसाठी देखील वेळ ठरवून देण्यात आली होती. या वेळेतच दुकानादारांना दुकाने उघडण्यास मुभा होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत गर्दी न करता या सेवा दिल्या जात होत्या. पोलिसांनीही जागोजागी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. 

त्यानंतर ६ जूनपासून राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा वेळेस इतर वस्तू विकण्यास मंजूर देण्यात आली. परंतु लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताच लोकं पुन्हा एकदा गर्दी करू लागले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन जागोजागी होताना दिसत आहे. मास्क न घालून फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्व परिस्थितीकडे बघता तसंच कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येकडे पाहता, प्रशासन पुन्हा एकदा कडक भूमिका घेऊ शकतं.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा