Advertisement

मुंबईत कोरोनाचे १२०१ नवे रुग्ण, ३९ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत सोमवारी दिवसभरात १२६९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५७ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे १२०१ नवे रुग्ण, ३९ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे  २०४ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२०१ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९ रुग्ण दगावले आहेत. तर २७ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे १२०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८५ हजार ३२६ इतकी झाली आहे. तर मुंबईत सोमवारी दिवसभरात १२६९ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५७ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे.राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार  २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज २०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २०४ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-६, ठाणे मनपा-१०, नवी मुंबई मनपा-२८,कल्याण-डोंबिवली मनपा-२, उल्हासनगर मनपा-४,भिवंडी निजामपूर मनपा-२,मीरा-भाईंदर मनपा-५,वसई-विरार मनपा-१३, पालघर-१, रायगड-१, पनवेल मनपा-३,नाशिक-४, नाशिक मनपा-१३, अहमदनगर-१, धुळे-३, धुळे मनपा-२,जळगाव-१२, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-१३, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-५, सातारा-४, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-७, जालना-५, लातूर-१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड-१, अकोला-१, अकोला मनपा-२, अमरावती मनपा- १, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा