Advertisement

Coronavirus update: कोरोनामुळे मुंबईत १३९१ इमारती सील

२९ एप्रिलपर्यंत मुंबईतील १३९१ इमारतींना सुरक्षेच्या कारणास्तव सील करण्यात आलं आहे. ७८२ ठिकाणं दाटीवाटीचे परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

Coronavirus update: कोरोनामुळे मुंबईत १३९१ इमारती सील
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus) संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिका (bmc) आणि राज्य आरोग्य विभागाकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच शहरातील कंटेन्मेंट झोनचा आकडा देखील वाढतच चालला आहे. त्यात २९ एप्रिलपर्यंत मुंबईतील १३९१ इमारतींना सुरक्षेच्या कारणास्तव सील करण्यात आलं आहे. ७८२ ठिकाणं दाटीवाटीचे परिसर म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

वरळी पॅटर्नचं कौतुक

मुंबईतील जी दक्षिण विभाग कोरोनाचा हाॅटस्पाॅट (mumbai hotspot) झाला होता. जी दक्षिणमधील वरळीत अनेक रूग्ण सापडले होते. मात्र, या ठिकाणी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला रोखण्यात यश आलं. जी दक्षिणमध्ये कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी महापालिकेने राबवलेल्या वरळी पॅटर्नची चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. केंद्राच्या पथकाने वरळी पॅटर्नचं (worli pattern) कौतुक केलंय. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरळीत अतिशय चांगलं काम करून कोरोनाला आटोक्यात आणलं आहे. वरळीतील कोळीवाडा सारखा दाट वस्तीचा प्रदेश पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी ५०० बेडचं क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे. 

हेही वाचा - महापालिकेत आता १०० टक्के उपस्थिती अनिवार्य

याबद्दल केंद्राच्या पथकानेही महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे. वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम काम करत आहे. केंद्राचं दुसरं पथकही वरळी भेट देऊन गेलं, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे. हे पथक वरळी पॅटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत. तर, महापालिका राज्य सरकारकडे याचा आराखडा पाठवणार आहे.

रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी कमी

दरम्यान, मुंबईत पालिकेला कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी रोखण्यात यश आलं आहे. मुंबईत रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र  शासननियुक्त समितीने काढला आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आता १० दिवसांवर गेला आहे. आधी ८.३ दिवस असा असलेला रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७ ते २७ एप्रिल दरम्यान दहा दिवसांवर गेला आहे. देश पातळीवर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९.५ दिवस आहे. तर राज्याचा कालावधी ८.९ दिवस आहे.

 केंद्रीय समितीने  हाजीअली ते वरळी, वरळी ते धारावी, चर्नी रोड ते धारावी, जे.जे. रुग्णालय ते चिंचपोकळी या विभागांसह विलेपार्ले ते ओशिवरा,  सांताक्रूझ ते जोगेश्वरी(पूर्व), सांताक्रूझ ते धारावी आणि चुनाभट्टी ते पवई या समूह विभागातील १७ ते २७ एप्रिल या काळातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. राज्याचा मृत्यूदर दर शंभर बाधित रुग्णांमागे सरासरी ४.३ आहे. तर मुंबईत तो सरासरी ३.९ टक्के झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी ६.३ टक्के एवढा होता.

हेही वाचा- सेव्हन हिल्स रुग्णालयात 'या' सुविधांची कमतरता


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा