Advertisement

महापालिकेत आता १०० टक्के उपस्थिती अनिवार्य

मुंबई महापालिकेत आता १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे एकदिवस आड कार्यालयात येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज उपस्थिती लावावी लागणार आहे.

महापालिकेत आता १०० टक्के उपस्थिती अनिवार्य
SHARES

मुंबई महापालिकेत आता १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे एकदिवस आड कार्यालयात येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज उपस्थिती लावावी लागणार आहे.

पाणी, कचरा व्यवस्थापन आदी दैनंदिन व्यवस्थेबरोबरच कोरोना रुग्णांवरील  उपचार, संशयितांचा शोध, अलगीकरण व्यवस्था, कामगार-बेघरांना व प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना अन्नपुरवठा या कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पालिकेची मनुष्यबळाची कुमक कमी पडत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ५० टक्के उपस्थितीचे आदेश रद्द केला आहे.  

कोरोनामुळे राज्य सरकारने पाच टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबईमध्ये वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता पालिकेत ५० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अधिकारी, कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे करोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता पालिका कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेच्या अन्य विभागांतील पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई आणि मुंबईच्या हद्दीबाहेरील अन्य भागांत राहणारे कर्मचारी, कामगारांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशा कर्मचारी, कामगारांनी खातेप्रमुखांची परवानगी घेऊन घरापासून जवळ असलेल्या पालिकेच्या विभाग कार्यालयात उपस्थित राहावे आणि नेमून दिलेले काम करावे, असे आदेश प्रशासनाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकात दिले आहेत.


हेही वाचा  -
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू






संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा