Advertisement

सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आता सॅनिटरी नॅपकिन मशीन

अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम आठ तास असते. मात्र, पोलिस दलातील कामकाज बारा तासांचे असते. सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ अशा दोन पाळ्यांमध्ये पोलीस दलाचे कामकाज सुरू असते. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर काम करणाऱ्या महिलांना रात्रपाळी करावी लागते.

सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आता सॅनिटरी नॅपकिन मशीन
SHARES

मुंबई पोलिस दलात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलिसही मोठी जबाबदारी सांभाळतात. पोलीस दलात गेल्या काही वर्षांपासून महिलांचा टक्का वाढत आहे. अन्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला पोलिसांच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे. ही बाब विचारात घेऊनच  मासिक पाळीवेळी महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने पोलिस दलातील सर्व कार्यालय आणि पोलिस ठाण्यात 'स्मार्ट मैत्रिण अभियान' अंतर्गत १४० सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. 


१२ तासांची ड्युटी

अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम आठ तास असते. मात्र, पोलिस दलातील कामकाज बारा तासांचे असते. सकाळी ९ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते सकाळी ९ अशा दोन पाळ्यांमध्ये पोलीस दलाचे कामकाज सुरू असते. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर काम करणाऱ्या महिलांना रात्रपाळी करावी लागते. त्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, सभा, मोर्चे, आंदोलने अशा वेळीही महिला कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे महिला पोलिसांच्या कामकाजाचं स्वरूप दगदगीचं असतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून वेळेत कामावर यावं लागतं. सकाळी नऊ वाजता कामावर हजर होणाऱ्या महिला पोलिसांना घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजतात. 


आयुक्तांच्या पत्नीच्या हस्ते उद्घाटन 

महिला पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांचा विचार करून गेल्या काही वर्षांत पोलीस दलात महिलांना विशेष सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रामकक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यातच आता मासिक पाळी दरम्यान महिलांना जाणवणाऱ्या अडचणी विचारात घेऊन 'स्मार्ट मैत्रिण अभियान' अंतर्गत शहरातील सर्व पोलिस कार्यालयात आणि पोलिस ठाण्यात १४० सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्यात आली आहेत. मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या पत्नी सौ. बर्वे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.  त्यावेळी इतर पोलिस स्टाफ आणि अधिकाऱ्यांच्या पत्नीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.



हेही वाचा -

फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला भोवली, ६८ हजारांना घातला गंडा

देवेन भारतींची बदली, साडेचार वर्षांपासून होते एकाच पदावर




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा