Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत १४६० नवे रुग्ण, दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात करोनाचे २५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४२ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत १४६० नवे रुग्ण, दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १६७ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १४६० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- Unlock Maharashtra: पुन्हा लाॅकडाऊन की अनलाॅक?, राजेश टोपे म्हणाले…

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ रुग्ण दगावले आहेत. तर २५ जून रोजी ५८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ जून रोजी रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे १४६० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ७३  हजार ७४७ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे २५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४२ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- KDMC: कल्याण-डोंबिवलीत कोरोना मृत्यूने शंभरी गाठली

राज्यात आज कोरोनाच्या ५३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार  १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.५७ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा