Advertisement

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात रद्द

भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे.

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात रद्द
SHARES

भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे.

भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळू लागला असल्यामुळे मुंबईकरांवरील १५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणी कपात अजून काही दिवस सुरू राहण्याची शक्यता होती.

दरम्यान, विद्युत केंद्रातील बिघाडाची दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचणी येत असून दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यानं केलं आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईतील लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील फुटलेली जलवाहीनी महापालिकेकडून दुरूस्त करण्यात आली.

या १ हजार ४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीच्या गळतीदुरुस्तीचं काम निश्चित वेळेच्या आधीच पुर्ण करण्यात आले. या जलवाहिनीचे १० तास आधीच मंगळवारी पहाटे ४.३० वाजता पूर्ण करण्यात पालिकेला यश आले.

जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ठरलेल्या वेळेच्या आधीच पुर्ण झाल्यानं धारावी, दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी, लोअर परळ भागात मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाला.



हेही वाचा

जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम १० तास आधीच पूर्ण

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा