१५० वर्षांपेक्षा जुने असलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकाला नवा साज मिळणार आहे. या स्थानकाचं संवर्धन व जपणूक करण्यासाठी विविध कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. तसंच, येत्या डिसेंबरमध्ये ही निविदा खुली करण्यात येणार आहे. त्यामुळं या स्थानकाच्या प्रत्यक्षात कामाला नवीन वर्षांतच सुरुवात होणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली.
वांद्रे स्थानकाच्या पश्चिमेला १ नंबर प्लॅटफॉर्मला लागूनच जुने कौलारू छप्पर, दरवाजे, खिडक्या आणि अन्य ऐतिहासिक वास्तूही आहेत. ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लागता या स्थानकाचं नूतनीकरण व संवर्धन कसं करावं हा पश्चिम रेल्वेसमोर प्रश्नच होता. हे काम करताना स्थानकालाही नवा साज देण्याचा निर्णयही घेतला आहे.
या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती केल्याची माहिती मिळते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वांद्रे स्थानकातील कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये निविदा खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर वास्तुविशारद व काही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वांद्रे स्थानकाचं काम केलं जाणार आहे.
हेही वाचा -
हार्बर सेवेचा लवकरच बोरिवलीपर्यंत विस्तार
आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा- संजय राऊत