Advertisement

वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल 18% ने वाढवला

1 एप्रिलपासून लागू होणार, जाणून घ्या नवीन दर

वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल 18% ने वाढवला
SHARES

मुंबईतील राजीव गांधी वांद्रे-वरळी 'सी लिंक' पुलावरील टोल टॅक्समध्ये सुमारे 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 एप्रिलपासून लागू होतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 

एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार आणि जीपच्या वन वे प्रवासासाठी 100 रुपये तर मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जातील. तर पुलावरून जाणाऱ्या ट्रकसाठी 210 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

नवीन दर कधी लागू होणार?

आतापर्यंत या आठ पदरी पुलावरून जाण्यासाठी वन वे शुल्क कार आणि जीपसाठी 85 रुपये, मिनीबससाठी 130 रुपये आणि ट्रक आणि बससाठी 175 रुपये ठेवण्यात आले होते. हे दर 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले होते. ते म्हणाले की सी लिंकवरील टोल शुल्काचे नवीन दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील आणि 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहतील. सी लिंक 2009 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

परतीचा प्रवासही महागला

एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुलावरून वारंवार जाणाऱ्या प्रवाशांसाठी परतीच्या प्रवासाचा पास आणि दैनंदिन पासचे दर त्यांच्या संबंधित वन-वे टोल शुल्काच्या 1.5 पट आणि 2.5 पट असतील. ते म्हणाले की मासिक पासची किंमत त्यांच्या संबंधित एकेरी प्रवासाच्या दराच्या 50 पट असेल.

अधिका-यांनी सांगितले की, सी लिंकला दक्षिणेकडील मरीन ड्राइव्ह-वरळी कोस्टल रोड आणि उत्तरेकडील बांद्रा-वर्सोवा कोस्टल रोडला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या 10.5 किमी लांबीच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा भाग सध्या ड्युटी फ्री आहे.



हेही वाचा

सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम तिसऱ्यांदा पुढं ढकललं!

मुंबई-नाशिक, शिर्डी, पुणे मार्गांवरील शेअर टॅक्सीच्या भाड्यात वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा