Advertisement

कल्याण-डोंबिवलीत १८७ इमारती अतिधोकादायक

कल्याण-डोंबिवलीत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १८७ इमारती अतिधोकादायक आणि २८४ इमारती धोकादायक ठरल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीत १८७ इमारती अतिधोकादायक
SHARES

कल्याण-डोंबिवलीत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १८७ इमारती अतिधोकादायक आणि २८४ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. या  अतिधोकादायक इमारती ३० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. या इमारतींमधील नागरिकांनी तातडीने घरं रिकामी करून भिवंडीसारखी दुर्घटना टाळावी, असं आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (केडीएमसी) अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी केलं आहे.

 भिवंडी शहरामध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  शासनाच्या आदेशाचं पालन करत केडीएमसी प्रशासनाने कल्याण-डोंबिवली शहरातील  ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. भिवंडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाकडून शहरातील सर्व इमारतींचे ऑडिट पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, करोना लॉकडाउन काळात पालिका प्रशासनाने दिलेल्या वेळेत इमारतीचे ऑडिट पूर्ण होणे अशक्य असल्याचं ऑडिटरचं म्हणणं होतं.


दरम्यान, उल्हासनगर महापालिकेने शहरातील एकूण १५० इमारतींचा समावेश धोकादायक इमारतींच्या यादीत केला आहे.देशातील अत्यंत दाटीवाटीचे शहर म्हणून उल्हासनगर शहराची ओळख आहे. १९९० च्या दशकात शहरात सर्वाधिक इमारती बांधल्या गेल्या. या इमारतींच्या बांधकामात उलवा रेतीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्यामुळे सध्या धोकादायक बनलेल्या इमारतींमध्ये १९९२ ते १९९८ च्या काळातल्या इमारतींचा अधिक समावेश आहे.


हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपयेRead this story in English
संबंधित विषय