Advertisement

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्यांना वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ
SHARES

मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्यांना वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात ५ ते २५ रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या ५ ही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत.

महानगर प्रदेशातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च सन २००२ ते २०२७ अशा २५ वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले असून, राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर ३ वर्षांनी वाढ होते. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत असून कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात ५ रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर ४० रुपये होणार आहे. 

मिनी बस, १२ ते २० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ६५ रुपये होणार आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात १०५ वरून १३० अशी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल १३५ रुपयांवरून १६० रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे. ५ ही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

टोलचे नवे दर

  • छोटी वाहने – ४० रुपये
  • मध्यम अवजड वाहने – ६५ रुपये
  • ट्रक आणि बसेस – १३० रुपये
  • अवजड वाहने – १६० रुपये
  • हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे.
  • पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.
Read this story in English
संबंधित विषय