Advertisement

बोरिवलीतील 8 मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू, 8 जखमी

ही आग लेवल-१ ची होती अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

बोरिवलीतील 8 मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू, 8 जखमी
SHARES

मुंबईत इमरातींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमरातीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 1 पुरुष आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. संपूर्ण इमारतीत धिराचे लोट पसरले आहेत. 

मुंबई अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ग्लोरी वालफाटी (४३) आणि जोसू जेम्स रॉबर्ट (८) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मी बुरा (40), राजेश्वरी भरत्रे (24) आणि रंजन सुबोध शहा (76) अशी तिघांची नावे आहेत.  

ही आग लेवल-१ ची होती अशी माहिती बीएमसीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

वृत्तानुसार, सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास साईबाबा नगरमधील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. अधिका-यांनी सांगितले की, आग लवकरच त्या मजल्यावरील विद्युत वायरिंगमधून संपूर्ण इमारतीत पसरली.

प्राप्त माहितीनुसारस ही आग ८ मजली इमरतीच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग आणि इंस्टॉलेशन्सपर्यंत मर्यादित आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बीएमसी, एमएफबी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दल्याच्या प्रयत्नांनी पवनधाम वीणा संतूर इमरातीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. त्याच बरोबर इमरातीला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन सुरु केलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा