विठ्ठल मंदिराला आता न्यायालयाचेही संरक्षण

 Pali Hill
विठ्ठल मंदिराला आता न्यायालयाचेही संरक्षण
विठ्ठल मंदिराला आता न्यायालयाचेही संरक्षण
See all

मुंबई - गिरगावमधील वैद्यवाडीतील पुरातन विठ्ठल मंदिर पाडता येणार नसल्याचं सांगत न्यायालयाने कोठारी बिल्डरला दणका दिलाय. 168 वर्ष हे जुने विठ्ठल मंदिर पाडून त्याजागी आलिशान टॉवरसाठी पार्किंग बनवण्याचा कोठारी बिल्डरचा डाव होता. मात्र त्याचा हा डाव मनसेनं या आधीच उधळून लावला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी येऊन गेल्यानं हा विषय प्रकाशझोतात आला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भक्तांना न्याय मिळाल्याचं मनसे विभाग प्रमुख धनराज नाईक यांनी सांगितलं.

Loading Comments