Advertisement

राज्यात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने 24 मे ते 27 मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीबाबतचा सविस्तर अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला.

राज्यात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू
SHARES

राज्यात (maharashtra) गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे (heavy rain) आतापर्यंत 21 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

तसेच 12 जण जखमी झाले असून 22 प्राणी दगावल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यात सर्वाधिक मृत्यूची नोंद ही पुणे (pune) आणि नांदेड जिल्ह्यात करण्यात आली असून, दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तिघांनी जीव गमावला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने 24 मे ते 27 मे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीबाबतचा सविस्तर अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात 25 मे रोजी, तर मुंबईत 26 मे रोजी मान्सून दाखल झाला आहे.

24 ते 27 मे दरम्यान राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. राज्यभरात पाण्यात बुडून, वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून अशा विविध कारणांनी 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लोक जखमी आहेत. याशिवाय, 22 गायी-म्हशी दगावल्या असून 2 जखमी आहेत.

या अहवालानुसार राज्यात गेल्या चार दिवसांत एकूण सरासरी 174.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात (kokan) सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांत 511.6 मिमी तर रत्नागिरी येथे 502.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच 41.4 मिमी पावसाची नोंद केली आहे.

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी सायंकाळपासून पाऊस सुरू आहे. पूर्णा आणि विदर्भ नदीच्या पुरात यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन जण वाहून गेले. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही मान्सूनने जोरदार हजेरी लावली , तर गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने पुण्यात विश्रांती घेतली.



हेही वाचा

मुंबईसह ठाण्यात मुसळधार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मोफत रोपे देणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा