Advertisement

धाडसी द्रविता २१ दिवसांनी परतली घरी

शनिवारी द्रविता सिंहला चर्नीरोडच्या भाटिया रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यानंतर तिला तिचे कुटुंबिय कल्याणच्या राहत्या घरी घेऊन गेले. द्रवितावर आतापर्यंत एकूण ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २१ दिवसांनी ती आपल्या घरी परतली आहे.

धाडसी द्रविता २१ दिवसांनी परतली घरी
SHARES

मोबाईल चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक पाय, पायाचा अंगठा आणि हाताची बोटं गमावलेली द्रविता सिंह (२३) उपचारानंतर नव्या उमेदीने आपल्या घरी परतली आहे.

शनिवारी द्रविता सिंहला चर्नीरोडच्या भाटिया रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यानंतर तिला तिचे कुटुंबिय कल्याणच्या राहत्या घरी घेऊन गेले. द्रवितावर आतापर्यंत एकूण ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २१ दिवसांनी ती आपल्या घरी परतली आहे.


नेमकं काय झालं?

  • ७ फेब्रुवारी रोजी ऑफिसला जाण्यासाटी द्रवितानं सकाळी कल्याणहून सीएसटीएमकडे जाणारी लोकल ट्रेन पकडली. सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन सोडल्यावर ट्रेन स्लो झाली. मोबाईलवर बोलत असताना रेंज गेली म्हणून द्रविता लोकलच्या दारात येऊन उभी राहिली. तेवढ्यात मोबाईल चोरण्याच्या हेतूने लाइटच्या पोलवर लपून बसलेल्या एका चोरट्याने द्रविताच्या डोक्यावर काठी मारली.
  • अचानक झालेल्या हल्ल्यामुळे द्रविताचा तोल गेला आणि ती थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर पडली. बाजूच्या ट्रॅकवर पडलेल्या द्रविताला काही क्षणांतच दुसऱ्या बाजूने दुसरी फास्ट ट्रेन येत असल्याचं तिला समजलं. द्रवितानं सगळं बळ पुन्हा एकवटलं आणि स्वत:ला ट्रॅकवरून बाजूला केलं. पण द्रविताचं बळ तोकडं पडलं. या प्रयत्नांमध्ये द्रविता ट्रॅकवरून तर बाजूला झाली, पण तिचा उजवा पाय आणि डाव्या हाताची बोटं फास्ट ट्रेनखाली आली.
  • आसपासच्या लोकांनी लागलीच द्रविताला ग्रँटरोडच्या भाटिया रूग्णालयात दाखल केलं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर २१ दिवसांनी म्हणजेच शनिवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला.


द्रविताचा पाय वाचवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला. द्रवितावर ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वॅक मशिनच्या साहाय्याने तिच्या जखमेतील संसर्ग काढून टाकला, तिथे त्वचारोपण केलं. तिच्या पायाला अजून प्लास्टर आहे. ६ आठवड्यानंतर तिचा चालण्याचा सराव घेतला जाईल. त्यासाठी खास फूटवेअर दिले जातील. त्याआधारे ती चालू शकेल.
- डॉ. शैलेश रानडे, प्लॅस्टिक सर्जन, भाटिया रुग्णालय

द्रविताला डिस्चार्ज दिला तेव्हा ती खूप खूष होती. पण, नंतर जेव्हा तिला तिचा हात दाखवला तेव्हा ती रडत होती. तिला थोडा धक्का बसला. मात्र ती खूप धाडसी आहे. ती लवकरच स्वत: ला सावरेल, असं डॉ. रानडे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

द्रविताच्या उपचारांचा खर्च भाटिया रूग्णालयाने उचलला

ट्रेनच्या दारात उभं रहाणं द्रविताला भोवलं, तीन बोटं आणि पायावरून गेली ट्रेन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा