SHARE

भांडूपमध्ये टेनिस क्रिकेट खेळत असताना एका २४ वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वैभव केसरकर असं या तरुणाचं नाव आहे. अचानक झालेल्या वैभवच्या निधनामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. 


कार्डियाक अॅटॅक 

भांडुपमध्ये सोमवारी टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत वैभव केसरकर गावदेवी संघाकडून खेळत होता. वैभव फलंदाजीसाठी मैदानात आला असता, त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यामुळं तो परत तंबूत गेला. काही वेळानं त्याचा त्रास वाढला. त्यामुळे त्याला उपचारासाठी भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डाॅक्टरांनी ईसीजी काढला. यामध्ये त्याला कार्डियाक अॅटॅक अाल्याचं दिसून अाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - 

खूशखबर! एसी लोकलच्या तिकीट दरवाढीला स्थगिती

गिरणी कामगारांच्या ८ हजार घरांची लाॅटरी फुटणार की रखडणार?
संबंधित विषय
ताज्या बातम्या