Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये २५ नवीन कोरोना रुग्ण, संख्या पोहोचली ३७६ वर

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका क्षेत्रात मंगळवारी २५ नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

मिरा-भाईंदरमध्ये २५ नवीन कोरोना रुग्ण, संख्या पोहोचली ३७६ वर
SHARES

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) महापालिका क्षेत्रात मंगळवारी २५ नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.    

मिरा-भाईंदरमध्ये (MBMC) आतापर्यंत COVID-19 चे ३७६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी बरे झालेल्या ३ रुग्णांचा समावेश करून आतापर्यंत २३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे सद्यस्थितीत १३४ जणांवर उपचार सुरू आहेत.  कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका २१ मे पर्यंत दुकानांसाठी नवीन वेळापत्रक आखून दिलं आहे. जेणेकरून गर्दी टाळता येईल. सोबतच महापालिकेने शहरातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट देखील जारी केली आहे.

कंटेन्मेंट झोन लिस्ट पुढीलप्रमाणे:

  • Kanugo Estate
  • Meditya Heritage
  • Al Fateh Mension
  • Sagar Manthan
  • Narendra Park
  • Asmita Orchid
  • Shivsena Galli
  • New Sai Charan
  • New Sai Krupa
  • Shripati
  • Poonam Sagar
  • Avadh Bldg, Opp Raj Estate, Kashimira
  • Devdarshan CHS, Modi-Patel Road, Bhayander (W)
  • Kranti Nagar
  • Ganesh Deval Nagar
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा