बदामाचं झाड पडून प्रशांत दामले जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद


SHARE

यंदा पावसाळ्यात झाड पडण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दादर परिसरात झाड अंगावर पडल्याने ४ जण जखमी झाले होते. त्याला काही दिवस उलटत नाही तोच मेट्रो सिनेमाजवळ झाड अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना ठाण्यातल्या पाच पखाडी परिसरात घडली आहे.


कशी घडली घटना

ठाण्याच्या पाच पाखाडी परिसरात बदामाचं झाड अंगावर पडल्याने २६ वर्षाचा प्रशांत दामले हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी प्रशांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकीकडे प्रवाशांचा मृत्यू तर दुसरीकडे झाड पडण्याच्या घटना आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.हेही वाचा-

महापालिका म्हणतेय 'मुंबईत ५० ते ६० खड्डेच शिल्लक'संबंधित विषय
ताज्या बातम्या