Advertisement

मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये २८ टक्क्यांनी घट

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ टक्के आहे.

मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये २८ टक्क्यांनी घट
SHARES

मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईत होम क्वारंटाईनच्या संख्येत २८ टक्क्यांनी घट झाली आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईनचं प्रमाणही ६२ टक्क्यांनी घटलं आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना होम आणि संस्थात्मक क्वारंटाईन केलं जातं.

राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ टक्के आहे. ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीतील रुग्णवाढीचा वेग ०.८७ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८० दिवसांवर पोहचला आहे. 

मुंबईत आतापर्यंत ५ लाख ७४ हजार ९१९ इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या शहर व उपनगरातील चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये ६२१ कंटेन्मेंट झोन असून ५ हजार ६०९ इमारती सील करण्यात आल्या आहेत.गुरूवारी मुंबईत कोरोनाचे ९१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९८८ बरे होऊन घरी परतले आहेत.  



हेही वाचा

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा